सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८१ व्या वाढदिवसा निमित्त सतिश काकडे व प्रमोद काकडे युवा मंच आयोजित निंबुत चषक २०२१ भव्य फुलपिच डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन शनिवार दिनांक १८/१२/२०२१ ते बुधवार दिनांक २२/१२/२०२१ रोजी पर्यंत करण्यात आलेले आहे.
सामन्यांचे प्रथम पारितोषिक मा. अभिजित काकडे यांच्या वतीने ५१,०००/- रू.व्दितीय पारितोषिक संजय नामदेव शिंदे यांच्या वतीने ३१,०००/- रू. तृतीय पारितोषिक राजेशभाऊ काकडे यांच्या वतीने २१,०००/- रू. व चतुर्थ पारितोषिक रतनदादा भ. काकडे यांच्या स्मरनार्थ ऋतुराज काकडे यांच्या वतीने ११,०००/- रू. तसेच उकृष्ठ फलंदाज, उकृष्ठ गोलंदाज, सहा षटकार, सहा चौकार अशा प्रकारच्या बक्षीसे देखील देण्यात येणार आहेत. सामन्यांचे आयोजन मु.सा. काकडे कॉलेज सोमेश्वरनगर येथे करण्यात आलेले असुन सामन्यांची वेळ सायंकाळी ५.०० ते रात्री १.०० वाजेपर्यंत असणार आहे.
क्रिकेट सामन्यांचा उद्घाटन समारंभ संजय शिंदे सतिश भट्ट यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किरण गुजर व सोमनाथ लांडे हे उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन विजुभाऊ सोरटे व योगेश शेलार येणार आहेत. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८१ व्या वाढदिवसा निमित्त आयोजित क्रिकेट सामन्यांचे संयोजन अभिजित काकडे युवा मंच निंबुत, भैरवनाथ क्रिकेट क्लब निंबुत व भैरवनाथ हॉलीबॉल संघ निंबुत यांच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी ग्रामिण भागामध्ये डे-नाईट प्रकराच्या भव्य अशा किकेट सामन्यांचे आयोजन हे पहिल्यांदाच होत आहे. तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे यांनी सांगितले.
COMMENTS