बारामती ! सुपे येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १०१ बाटल्या रक्त संकलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राजे प्रतिष्ठाण संचलित न्यू इंग्लिश स्कुल व मयुरेश्वर आय टी आय यांचे वतीने भव्य रक्तदान, सर्व रोग आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
          शिबिराचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष  दिलीप खैरे तसेच रक्तदाते प्रभाकर भोंडवे , शशिकांत खैरे , शुभम चांदगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विश्वराज हॉस्पिटल तर्पण ब्लड बँक लोणी काळभोर याचे प्रतिनिधी प्रवीण नवले , सुरेश शितोळे उपस्थित होते. शिबिराला डॉ. प्रमोद पवार, डॉ. चंद्रकांत हाके यांनी भेट दिली रक्तदाना करता रक्तदात्याचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला या वेळी १०१ रक्त दात्यांनी रक्तदान केले. तसेच  नेत्र तपासणी साठी उस्फुर्त असा प्रतिसाद होता नेत्र तपासणी नंतर आवश्यक त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेच्या सचिव मनीषा खैरे,आय टी आय चे प्राचार्य उद्धव वाबळे व सर्व शिक्षक व शक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
To Top