भोर ! आगामी काळातील निवडणुकीच्या कामाला लागा : शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्याने सर्वसामान्य जनतेच्या विकास कामावर भर देण्यात आला आहे.शिवसेनेच्या माध्यमातून विकास हा होतच राहणार आहे.आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. शिवसैनिकांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ताक्तिनिशी कामाला लागावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी भोर येथील गं.प.वाचनालयाच्या घेण्यात आलेल्या भोर तालुका शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात  केले.                                                                          यावेळी पश्चिम महाराष्ट्र सहकार आघाडीचे अध्यक्ष प्रदीप खोपडे,तालुका प्रमुख हनुमंत कंक,शैलेश वालगुडे,अर्जुन चव्हाण सोपान कंक,दिपक दामगुडे,सोपान कंक,किशोर बांदल,दशरथ जाधव गणेश उफाळे,गोविद सावले,शंकर जाधव,बाळु वाटकर,सुनिल खोपडे,पंडीत खाटपे,विठठल गुरव,हनुमंत धामुणसे उपस्थित होते.                             पश्चिम महाराष्ट्र सहकार आघाडीचे अध्यक्ष प्रदीप खोपडे मनोगतात म्हणाले राज्यात शिवसेनेची सत्ता असुन त्या सत्तेच्या माध्यमातून कामे तळागाळातील लोकांपर्यत पोहचवावीत.आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत संपुर्ण ताकतीने उतरुन कामाला लागावे त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.

To Top