सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने ऊसतोडणी कामगारांच्या झोपड्यांमधील अन्यधान्य भिजल्यामुळे सोमेश्वर कारखाना प्रशासनाने तब्बल ४ हजार ६०० कुटुंबांना किराणा किट चे वाटप केले.
अवकाळी पावसामुळे सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १६८ गावांमधील ऊसतोडणी कामगारांच्या कुटुंबाला पावसाच्या पाण्याला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांच्या आघातावर फुंकर घालत छोटीशी मदत देऊ करत किराणा वाटप केले आहे. कारखान्याने दिलेल्या किराणा किट मध्ये साखर, तांदूळ, बेसनपीठ, तेल, शेंगदाणे, डाळी अशा प्रकारचे साहित्य असून एक किट ४०० रूपयांच्या आसपास असून शेतकी विभागातील चिटबॉय च्या माध्यमातून ही सर्व किराणा किट ऊसतोडणी पर्यंत पोहोच करण्याचे काम सुरू असल्याचे शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी संचालक ऋषिकेश गायकवाड, प्रवीण कांबळे, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, ऊस वाहतूक संघटनेचे कैलास मगर, प्रभाकर जगताप, नितीन जगताप, प्रदीप जगताप, शेतकी विभागाचे अशोक जगताप, रमेश जगताप यांच्यासह मुकादम व ऊसतोडणी कामगार उपस्थित होते.
---------------------
ऋषी गायकवाड : संचालक सोमेश्वर कारखाना-
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागले. पुढील वर्षी ऊसतोडणी कामगारांना अशा कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सोमोरे जावे लागणार नाही. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यास संचालक मंडळ बांधील राहील.