सोमेश्वर रिपोर्टर टीम------
हिवाळा ऋतू ,थंडीचे दिवस त्यात अवकाळी पाऊस अशा वातावरणात ऊसतोड मजूर - कामगार भल्या पहाटे ऊसतोड करायला निघत आहेत . सोबत त्यांची छोटी लहान मुले असतात. थंडी पासून बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे उबदार कपड्यांची वाणवा असते . अंगभर कपडे सुध्दा काहींच्या नशिबी नसतात . ही परिस्थिती पाहून साद संवाद स्वच्छता वाणेवाडी टीम ने वेगवेगळ्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर आव्हान केले की ,स्वच्छ , ऊबदार , वापरण्यायोग्य जुने कपडे असतील तर साद संवाद च्या सदस्यांना कळवा , आपल्या घरून कपडे घेऊन ते गरजूंपर्यंत पोहचवू . या उपक्रमास लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला . वाणेवाडी , सोमेश्वरनगर , वाघळवाडी , करंजेपुल तसेच विद्याप्रतिष्ठान सोमेश्वरनगर चे शिक्षक व बारामतीतील अवितेज अपार्टमेंट इत्यादी ठिकानाहून कपडे गोळा करण्यात आले . ५०० पेक्षा जास्त जणांना पुरेल इतके स्वेटर , जर्किन , साड्या व ड्रेस जमा झाले . आज थेट ऊसतोड मजूर वसाहतीत जाऊन वाटप करण्यात आले . या वाटप प्रसंगी गौतम काकडे , ऍड. नवनाथ भोसले , महेश जगताप , युवराज खोमणे , साद संवाद स्वच्छता चे समन्वयक ज्ञानेश्वर जगताप , कुलदीप शिंदे , निलेश जगताप , चंद्रशेखर भोसले , दीपक भोसले , सौरभ जगताप , शशिकांत जेधे यासोबत सर्व सदस्य उपस्थित होते . हे वाटप करताना तेथे आशा प्रकल्प अंतर्गत काम करणारे स्वयंसेवक शरद ननवरे , संभाजी सोनवणे , नौशाद बागवान यांनी साहाय्य केले .