सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोर तालुका सोसायटी अ वर्ग गटातून विध्यमांन संचालक व काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी सोमवार दि-६ उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देविदास भन्साळी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस श्रीरंग चव्हाण,तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे,जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, राजगड कारखाना व्हा.चेअरमन विकास कोंडे,राजगड संचालक पोपट सुके,ज्ञानेश्वर झोरे,मदन खुंटवड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार थोपटे यांनी सलग २ वेळा जिल्हा बँकेवर संचालक म्हणून काम पाहिले असल्याने थोपटे यांना जिल्हा बँकेच्या कामकाजाचा तसेच सहकाराचा मोठा अनुभव आहे.