भोर : आंबाडेत बिबट्याने पाडला पाळीव कुत्र्याचा फडशा : नागरिकांच्यात दहशतीचे वातावरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
 भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील आंबाडे  ता. भोर येथे रविवारी पहाटेच्यावेळी बिबट्याने राजेंद्र पोपटराव खोपडे याच्या जनावरांच्या गोठ्या समोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला.
           बिबट्या काही दिवसापासून नेरे,वरवडी,बालवडी येथील जंगल परिसरात नागरिकांच्या निदर्शनास येत होता.मात्र रविवारच्या रात्री बिबट्याने आंबाडे गावात येऊन पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. बिबट्याने पाळीव कुत्र्याचा फडशा पाडल्याचे लक्षात आल्याने आंबाडेचे सरपंच कविता मनोज खोपडे यांनी वनविभागाशी त्वरित संपर्क केला.वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ व वनपाल संदीप खट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विशाल आढगळे व वनकर्मचारी अशोक चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.यावेळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने नर बिबट्या असल्याचे खात्रीशीर नागरिकांना सांगण्यात आले.तसेच नागरिकांनी सावध राहावे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, जंगलात जाताना सावधगिरी बाळगावी असेही वनविभागाकडून सांगण्यात आले.

To Top