सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

खबरदार ! ड्रोन कॅमेरा वापरण्यापूर्वी आता घ्यावी लागणार स्थानिक पोलिस स्टेशनची परवानगी

सोमेश्वर रिपोर्टर टीम  - - - -
सोमेश्वरनगर दि ३०

               संपूर्ण पुणे जिल्हा ग्रामीण भागात ड्रोन कॅमेरा द्वारे चित्रीकरण करण्यास मा.जिल्हाधिकारी सो पुणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पुणे ग्रामिण जिल्ह्यातील छायाचित्र करणारे व्यवसायिक,खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट, संस्था यांना त्यांचे छायाचित्रणात ड्रोन कॅमेराचा वापर करावयाचा असल्यास त्याची पूर्व माहिती संबंधित पोलिस स्टेशन ला ७ दिवसांपूर्वी कळवून मा.जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचे कडील रीतसर परवानगी घेणेबाबत त्यांचेकडील जा.क्र -पगक/कावि/८१३७/२०२१ दिनांक - २७/१२/२०२१ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेला आहे.
         संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यातील महत्त्वाची धार्मिक स्थळे,धरणे, केंद्रीय संस्था असून वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचना तसेच गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहाळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याबाबत कळविण्यात आलेले आहे या व्यतिरिक्त पुणे ग्रामीण जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या धार्मिक सोहळे, लग्नसमारंभ, राजकीय सभा किंवा इतर कार्यक्रम मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा समावेश असतो अशा ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्र होऊन त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता ड्रोन कॅमेरा चा छायाचित्रणाकरीता वापर करणाऱ्या संस्थांनी व आयोजकांनी त्याबाबतची पूर्व माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला देणे आवश्यक आहे जेणेकरून त्याची वेळीच पडताळणी करून त्याबाबतची सत्यता पटवून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेता येईल.
          त्याअनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन क्षेत्रांतर्गत कोणत्याही कार्यक्रम किंवा इतर प्रयोजनासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करावयाचा असल्यास त्याची माहिती ७ दिवस अगोदर गोपनीय शाखा, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे देऊन पोलीस स्टेशन कडील ना-हरकत दाखला नागरिकांनी त्यांचे विनंती अर्जासोबत जोडून  मा.जिल्हाधिकारी सो.कार्यालय पुणे यांचेकडून रीतसर परवानगी घ्यावी. अन्यथा विनापरवानगी ड्रोन कॅमेराचा वापर होत असलेबाबत माहिती मिळाल्यास किंवा निदर्शनास आलेस मा.जिल्हाधिकारी सो पुणे यांचे आदेशाचा अवमान केला म्हणून संबंधित सर्व साहित्य जप्त करून प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि सोमनाथ लांडे यांनी दिलेली आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7034,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : खबरदार ! ड्रोन कॅमेरा वापरण्यापूर्वी आता घ्यावी लागणार स्थानिक पोलिस स्टेशनची परवानगी
खबरदार ! ड्रोन कॅमेरा वापरण्यापूर्वी आता घ्यावी लागणार स्थानिक पोलिस स्टेशनची परवानगी
https://lh3.googleusercontent.com/--z3GmK9lvxM/Yc3LWdSjnEI/AAAAAAAAD6Q/S-x0_k8_hSwJRnBlPjAmsy0bsTc_SWMWwCNcBGAsYHQ/s1600/1640876886917997-0.png
https://lh3.googleusercontent.com/--z3GmK9lvxM/Yc3LWdSjnEI/AAAAAAAAD6Q/S-x0_k8_hSwJRnBlPjAmsy0bsTc_SWMWwCNcBGAsYHQ/s72-c/1640876886917997-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/12/blog-post_459.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/12/blog-post_459.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy