विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत मयुरेश्वर देवस्थान विकास आढावा बैठक संपन्न

Pune Reporter



सोमेश्वर रिपोर्टर टीम  - - - - 

बारामती दि.११

 विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मयुरेश्वर मंदिरात  देवस्थान परिसर विकास आणि भाविकांना द्यावयाच्या सोयी सुविधाबाबत आढावा घेतला.

 यावेळी मोरगावचे सरपंच निलेश केदारे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे सहव्यवस्थापक विजय गोलांडे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पदाधिकारी, आदी उपस्थित होते.

    डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,  देवस्थान प्रशासनाने आणि शासकीय अधिकाऱ्यांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भक्तांसाठी भक्तनिवास स्वच्छ आणि चांगले ठेवावे. अन्नछत्राच्या माध्यमातून  भक्तांना  चांगले भोजन देण्यात यावे. देवस्थानच्या ठिकाणी  अधिकच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काही  सूचना अगर प्रस्ताव असल्यास ग्रामपंचायत आणि देवस्थान प्रशासनाने तो सादर करावा.  सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पर्यटन विभागामार्फत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना  नियमांचे पालन करूनच भाविकांना दर्शन देण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी विजया शिंदे, सुनीता मोरे व शादाब मुलाणी आदी उपस्थित होते.


To Top