सोमेश्वर रिपोर्टर टिम----------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील चंद्रकांत राजाराम भोसले रा वाणेवाडी यांच्या जेजुरी येथे क्रेनचा हूक लागल्या कारणाने अपघाती मृत्यू झाला आहे .
दि २१रोजी चंद्रकांत भोसले हे मोटारसायकलवरून निरा- जेजुरी रस्त्याने ते सासवड येथील वाघेरे कॉलेजवर कामासाठी चालले होते. दरम्यान जेजुरी एम आय डी सी चौकात आले असता एक हायड्रा क्रेन भरधाव वेगाने रस्ता ओलांडत चौकामध्ये पुढे आली. त्या क्रेनच्या समोरील गप्पी हुक हे भोसले यांच्या डोक्याला लागून अपघात झाला व त्यांना दुखापत झाली यामध्ये मृत्यू झाला झाला. क्रेन चालक तेथून फरार झाला आहे. याबाबत अमोल भोसले यांनी जेजुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुढील गुन्ह्याचा तपास सहा पो. फौजदार लोंढे करीत आहेत.
COMMENTS