मु.सा.काकडे महाविद्यालयाला सांघिक विजेतेपद : हडपसर येथे स्पर्धेचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
 एस. एम. जोशी महाविद्यालय हडपसर येथे आयोजित पुणे जिल्हा अंतर महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत  मु.सा.काकडे महाविद्यालयाने सांघिक विजेते पद मिळवले विजयी संघातील खेळाडू पुढीप्रमाणे सौरभ जाधव 66kg सुवर्ण पदक, आदेश कोतवाल 81kg सुवर्ण पदक, गौरव शेटे 90kg सुवर्ण पदक त्याच प्रमाणे संघाच्या विजयामध्ये महेश येले, चंदन मरगजे, शशांक जांभळे, रोहित भोसले, सुमित मरगजे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.       
      विजयी खेळाडूंना डाॅ. बाळासाहेब मरगजे व प्रा. दत्तराज जगताप यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे अधक्ष श्री. सतिशराव काकडे देशमुख, सचिव जयवंतराव घोरपडे, सहसचिव सतिश लकडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व नाशिक येथे होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
To Top