सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
राज्य शासनाने कोविड १९ या आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांना ५० हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीतून प्रदान करण्यास मान्यता दिली आहे.
सदर अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरुपात राबविण्यात येणार असून याकरिता mahacovid१९relief.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. कोविड १९ या आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांनी स्वतः किंवा सेतू केंद्रातून किंवा ग्रामपंचायतीतील CSC किंवा SPV मधून अर्ज करू शकतील अशी माहिती भोर तहसीलदार सचिन पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.
संबंधित नातेवाईकांनी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी.अर्जदाराचा स्वतःचा तपशील आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील,मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र ,इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असलेले स्वयंघोषणापत्र जमा करून तात्काळ सदरचा अर्ज वरील वेबपोर्टलवर भरण्यात यावे असे तहसीलदार यांनी आवाहन केले आहे.
COMMENTS