सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सिकंदर शेख यांची तर सचिवपदी न्यू इंग्लिश स्कूल लोणीभापकर विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप जगताप यांची बिनविरोध निवड झाली.
शारदानगर (ता. बारामती) येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतनमध्ये मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव नागनाथ ठेंगल होते. याप्रसंगी डी. सी. धुमाळ, एस. एन. गावडे, प्रवीण साठे, एस. पी. जगताप, दत्तात्रेय पांढरे उपस्थित होते. यानिमित्ताने सर्व निवडी एकमताने पार पडल्या. यानिमित्ताने मुख्याध्यापकांनी अटल सायन्स इनोव्हेशन सेंटरला भेट दिली. प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे मावळते अध्यक्ष आऱ. ए. धायगुडे यांनी केले. आभार एस. एम. मुंडे यांनी मानले.
अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - कार्याध्यक्ष - गणपत गवळी (धो. आ. सातव विद्यालय, बारामती), उपाध्यक्ष - अनिल धुमाळ (न्यू इंग्लिश स्कूल गोजुबावी), जयवंत नाकुरे (भैरवनाथ विद्यालय, मेडद) व शब्बीर इनामदार (न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती) सहसचिव - डी. व्ही. इंगळे (विठ्ठल विद्यालय, कांबळेश्वर) व अनिल चव्हाण (वसतीगृह विद्यालय काऱ्हाटी) विद्यासमिती सचिव- संजय कांबळे (न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी) विद्यासमिती सहसचिव - ए. एल. काटे (भैरवनाथ विद्यालय, उंडवडी), एम. डी. बाबर (सोमेश्वर विद्यालय, अंजनगाव). खजिनदार - उमेद सय्यद (म.ए.सो. बारामती). ऑडीटर - एम. डी. कोकरे (गडदरवाडी विद्यालय), प्रसिध्दीप्रमुख- एच. एस. ढमे (न्यू इंग्लिश स्कूल नारोळी). वार्ता सहसंपादक- आर. एच. शिंदे (नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे). उपक्रम प्रमुख - दीपाली ननावरे (बा. सा. काकडे विद्यालय). विनाअनुदानित प्रतिनिधी - ए. जी. दुधाळ (जनहित विद्यालय, बारामती), इंग्रजी मिडियम प्रतिनिधी - राम साळुंके (क्रिएटीव्ह स्कूल बारामती)
माजी शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, उपशिक्षणाधिकारी अंकुश शिंदे, गटशिक्षणाधिकारी संजय जाधव, शिक्षक नेते अरूण थोरात, हरिश्चंद्र गायकवाड, नंदकुमार सागर, प्रसाद गायकवाड, सुधाकर जगदाळे, सुरेश कांचन, आदिनाथ थोरात, कल्याण बर्डे आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
---