सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

भीमा नदीवर एक टीएमसी साठवणक्षमतेची बॅरेजेस बांधावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार


 

            पुणे, दि. १५-

 तापी नदीवरील बॅरेजेसच्या धर्तीवर चासकमान प्रकल्पाच्या क्षेत्रात तसेच धरणाखाली प्रत्येकी एक टीएमसी साठवण क्षमतेचे तीन बॅरेजेस बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

            चासकमान कालवे सल्लागार समितीची बैठकीत ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री अशोक पवार, दिलीप मोहिते- पाटील आदी उपस्थित होते. पवना प्रकल्प तसेच भामा आसखेड प्रकल्पांचीही कालवे सल्लागार समिती बैठकादेखील यावेळी पार पडल्या. त्यास पिंपरी- चिंचवडच्या महापौर माई ढोरे याही उपस्थित होत्या.

            चासकमान प्रकल्पातून सिंचनासाठी रब्बीचे एक आणि उन्हाळी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय बैठकीत झाला. पवना प्रकल्प तसेच भामा आसखेड प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा असून नियोजनाप्रमाणे पाणी सोडण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

चासकमान प्रकल्प:

            चासकमान प्रकल्पात गतवर्षीपेक्षा सुमारे 3 टक्के अधिक पाणी आहे त्यामुळे रब्बीसाठी एक आणि उन्हाळी दोन आवर्तने देण्याचे नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री. पवार यांनी दिले. कालव्यांची गळतीची ठिकाणे निश्चित करुन गळती काढण्याची कामे हाती घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.

            कालव्यावरील लोखंडी पूल खराब झाले असल्याने दुसऱ्या बाजूस वाहने घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अंतराचा वळसा घालावा लागतो. त्यामुळे लोखंडी पुलांच्या बाजूला सिमेंटचे पूल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करुन सादर करावेत. त्यास निधीची तरतूद करण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

            बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, जलसंपदा विभागाचे मुख अभियंता एच.व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय चोपडे आदी उपस्थित होते.

            पवना आणि भामा आसखेड प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा असल्याने सिंचनासाठी नदीत यापूर्वीच्या नियोजनाप्रमाणे पाणी सोडण्यात यावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7050,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : भीमा नदीवर एक टीएमसी साठवणक्षमतेची बॅरेजेस बांधावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार
भीमा नदीवर एक टीएमसी साठवणक्षमतेची बॅरेजेस बांधावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhULRwYO1XssqHVvmvu53R9Gm1wksNz7V3zMZN72e3F8VllDWifaRCM0vftqudFce_F4OVqtgYck99Z1nIY9QgojuquJqlxJMFcGgxYbEwS60gRbagWUB-4oGmUMv1Os-PwfzuubOBrdIv7M9cvgB178MiM75OZDmrFtsXCPmw0liXMPhDiKTD9bg8n
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhULRwYO1XssqHVvmvu53R9Gm1wksNz7V3zMZN72e3F8VllDWifaRCM0vftqudFce_F4OVqtgYck99Z1nIY9QgojuquJqlxJMFcGgxYbEwS60gRbagWUB-4oGmUMv1Os-PwfzuubOBrdIv7M9cvgB178MiM75OZDmrFtsXCPmw0liXMPhDiKTD9bg8n=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_202.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_202.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy