सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील वरंधा घाटात शुक्रवार दि-१४ सकाळी ८ च्या दरम्यान दाट धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने चारचाकी कार दरीत धरणाच्या पाणी पात्राच्या बाजूला कोसळली. मात्र गाडी दरीत कोसळूनही या अपघातातून गाडीतील चारही प्रवासी नशीब बलवत्तर म्हणून बचावले असून चौघेही सुखरूप असल्याची माहिती शिरगाव ता.भोर सरपंच यांनी दिली.
या अपघात ग्रस्त गाडीतील चार प्रवाशी मूळ र.चिपळूण येथील असून त्यांचा पुण्यात व्यवसाय आहे.चौघेही पुण्याहून खेड येथे वरंधा घाटातून देवीच्या दर्शनासाठी ईरटीका एमएच १४ जेई ८०४९ या गाडीतून चालले होते.मात्र घाटातील दाट धुक्याचा अंदाज न आल्याने गाडी दरीत कोसळली.महामार्ग पोलिस सारोळा पोलीस उपनिरीक्षक विनायक कापसे,हवालदार संतोष अर्जुन,रामदास केचे,भोर पोलीस आप्पा नवले यांनी क्रेनच्या सहाय्याने मदतीने दरीत कोसळलेली गाडी बाहेर काढली.अपघातग्रस्त गाडीतील चारही प्रवाशी सुखरूप असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.
COMMENTS