सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर ता बारामती येथील लियाकत दुलेखान पठाण यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. मूळचे बीड येथील असणारे लियाकत पठाण हे गेले अनेक वर्षांपासून सोमेश्वरनगर येथे वास्तव्यास होते. अभिनेते समद पठाण यांचे बंधू तसेच पत्रकार नाविद पठाण यांचे ते चुलते होत.त्यांच्या पश्चयात पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे.
COMMENTS