बारामती पश्चिम ! या कालावधीत 'मोरगाव' येथे माघ यात्रा उत्सव पार पडणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथील   माघी यात्रा उत्सव उद्या मंगळवार  दि. १  ते शनिवार दि ५ या काळात  संपन्न होणार आहे .उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी भक्तांना   माघ शुद्ध प्रतीपदा ते शुद्ध पंचमी पर्यंत  श्रींच्या मुख्य मुर्ती गाभाऱ्यात जाऊन श्रींस  जलस्नान घालण्याची पर्वनी साधता येते  . मात्र  कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे  खबरदारीचा उपाय म्हणून  भक्तांना मुक्तद्वार दर्शनाचा लाभ घेता  येणार नाही   मात्र मुर्ती गाभाऱ्याबाहेरुन  नियमित दर्शन भक्तांना  घेता येणार  आहे  . याबाबत प्रशासना मार्फत  सुचना दिल्यानुसार हा निर्णय घेतला  असल्याची माहीती   चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार व  सरपंच निलेश केदारी  यांनी दिली .

मोरगाव ता . बारामती येथील माघी यात्रा उत्सव उद्या दि . १ पासुन सुरु होत आहे.   उत्सवा निमित्ताने उद्या मयुरेश्वरास  हिरे , माणिक मोती  युक्त सुवर्णालंकार  चढविले जाणार आहेत . दरवर्षी माघ शुद्ध प्रतीपदा ते माघ शुद्ध पंचमी या काळात  सर्व धर्मीयांना  मुख्य मुर्ती गाभाऱ्यात जाऊन  स्वहस्ते मयुरेश्वरास   जलस्नान  घालता येते . मात्र  कोरोना या  विषाणूजन्य आजारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून  जलस्नान  घालता येणार नसल्याच्या सुचना प्रशासना मार्फत  आज  वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पिएसआय  शेख यांनी  दिल्या . 
मंदिराच्या चार दिशांना चार द्वार असून  द्वार मंदिर ठिकाणी अनवाणी चालत जाऊन  दुर्वा वाहण्याची विशीष्ट अशी प्रथा  येथे प्रचलीत आहे . तिथीचा क्षय आल्यामुळे बुधवार  दि २ पासून  ते शुक्रवार दि . ४ पर्यंत केवळ तीन दिवस  येथील द्वार यात्रा  संपन्न  होणार आहे .उत्सवानिमित्त  दि ३  रोजी  मोरया गोसावी प्राप्त  मंगलमुर्ती पालखी  सोहळा चिंचवड येथून मोरगाव येथे   सायं ७  वाजता  येणार आहे . सालाबादप्रमाणे चालत आलेले  सर्व  नियोजित धार्मिक विधी व कार्यक्रम  संपन्न  होणार आहेत असून भक्तांना बाहेरुन नियमित दर्शनासाठी मंदिर सुरुच राहणार असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली .
To Top