सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
सायबेज आशा संस्थेच्या माध्यमातून खेडोपाड्यातील महत्वाची विकास कामे केली जात आहेत. भोर तालुक्यातील वेळवंड खो-यातील म्हाळवडी येथे संस्थेच्या ट्रस्टी व सायबेज सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालिका रितू नथानी यांच्या हस्ते प्राथमिक शाळेचे शौचालय, शेतकरी गटास शेती पाण्यासाठी इलेक्ट्रिक लिफ्ट व गावात भूमिगत गटार तर बारे खुर्दला सोलर पंप उपसा योजना, ज्ञानप्रबोधणी संस्थेच्या सहाय्याने शिवण वर्ग सुरू करून , बायोगॅस संच वाटप केले असून उदघाटन केले .यामुळे खेडोपाड्यांचा विकासाला गती आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यावेळी उदघाटन प्रसंगी सहाय्यक तालुका विकास अधिकारी कुलदीप भोंगे व कृषि अधिकारी शिवराज पाटील ,म्हाळवडीचे सरपंच दत्तात्रय बोडके, बारे खुर्द चे सरपंच महेश खुटवड,उपसरपंच, पोलीस पाटील,शेतकरी बांधव ग्रामस्थ, आदींसह बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. म्हाळवडी व बारे खुर्द या दोन्ही गावांत कामाला प्रत्येकी साधारण १ हजार लोकवस्तीची गावे आहेत. गावातील शेतकरी प्रगत व समृद्ध व्हावा म्हणून संस्थेने बायफ संस्थेच्या माध्यमातून २०१७ पासून यापूर्वी गटविहिरी बांधणे,रस्ते, फळबाग लागवड, पिण्याच्या पाण्याची सोय, भाजीपाला लागवड, चारापीक, भातशेतीचे उत्तम मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबविले याचा अंतिम उद्देश गाव व शेतकरी समृद्ध होणे हा आहे.