सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
दिवे (ता पुरंदर) येथील भापकर माळा या ठिकाणी दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा मनात राग धरून आरोपी संजय बबन भापकर, किरण झेंडे (दोघे रा.दिवे ता.पुरंदर) यांनी अशोक लक्ष्मण भापकर (वय ५६ रा.भापकर मळा) याचा धारदार शस्त्राने खून केला असल्याची फिर्याद लता अशोक भापकर यांनी सासवड पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २४ जानेवारी २०२२ रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास भापकर मळा येथे आमचे राहते घराजवळ माझे पती अशोक लक्ष्मण भापकर यांना संजय बबन भापकर व किरण झेंडे यांनी काळेवाडीच्या ढाब्यावर झालेल्या भांडणाचे कारणावरून घरी येवुन पतीला बाहेर बोलावले व कसल्यातरी तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, तोंडावर वार करून त्यांचा खुन केला आसल्याची फिर्याद दाखल केली आहे. सदरच्या घटनास्थळाला सासवड भोर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेट दिली आहे तर पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.
COMMENTS