सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापनदिनाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा



मुंबई, दि. २५
देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी प्राणांचं बलिदान केलेल्या शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं असून देशवासियांना प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विविधतेत एकता’ ही आपली ताकद असून जात, धर्म, भाषा, पंथ, प्रांताच्या भिंती ओलांडून समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी एकत्र येण्याचं आणि एकजूट कायम ठेवण्याचं आवाहन उपमुख्यंत्र्यांनी राज्यातील जनतेला, देशवासियांना केलं आहे.

भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपला देश स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक झाला, त्यावेळचा काळ देशासाठी खूपच कठीण काळ होता. देशासमोर अनेक आव्हानं होती. परंतु गेली 72 वर्षे हे प्रजासत्ताक आपण टिकवलं, वाढवलं, सुरक्षित केलं. जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली, याचं श्रेय देशातील जनतेला, जनतेच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी लोकशाही व्यवस्थेवर, राज्यघटनेवर अढळ विश्वास असलेल्या तमाम देशवासियांना वंदन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, देशाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या योगदान, त्यागाबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या मान्यवरांचे, राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या राज्याच्या पोलीस, अग्निशमन सेवेतील पुरस्कार विजेत्यांचे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांचेही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापनदिनाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापनदिनाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
https://lh3.googleusercontent.com/-_kYNQGmjD3g/Ye_5h8O_9wI/AAAAAAAAEbQ/bhRzwgFkM3AMixBAz8tB9WB0RN1rpvZFgCNcBGAsYHQ/s1600/1643116932425053-0.png
https://lh3.googleusercontent.com/-_kYNQGmjD3g/Ye_5h8O_9wI/AAAAAAAAEbQ/bhRzwgFkM3AMixBAz8tB9WB0RN1rpvZFgCNcBGAsYHQ/s72-c/1643116932425053-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_793.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_793.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy