बारामती पश्चिम ! माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतले मयुरेश्वराचे दर्शन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
मोरगाव : अष्टविनायक तिर्थस्थळ मोरगांव ता . बारामती  येथे आज मयुरेश्वराचे दर्शन  माजी केंद्रीय  मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतले . यावेळी अभीषेक पुजा करुन  देश  कोरोनामुक्त  होण्यासाठी मयुरेश्वराकडे   याचना  केली .
          आज दुपारी तीन वाजता माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मोरगाव येथे मयुरेश्वर दर्शनासाठी आले होते . यावेळी  मंत्रोपचाराच्या सहाय्याने अभीषेक पुजा  येथील पुजारी किशोर वाघ , विजय ढेरे व  ग्रामजोशी दिलीप वाघ ,  कौस्तुभ वाघ यांनी केली . अभीषेक ,  संकल्प व आरती नंतर  त्यांनी  कोरोनामुक्त महाराष्ट्र व देश होण्यासाठी मयुरेश्वरास त्यांनी  याचना केली .
          मंदिर परीसरात असणाऱ्या स्वच्छते विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले . यावेळी   चिंचवड देवस्थान ट्रस्टचे  विश्वस्त विनोद पवार व मोरगावचे सरपंच  निलेश केदारी यांनी जावडेकर यांचा सत्कार केला . यावेळी पर्यटन विकास मंडळाकडुन  प्रलंबित असलेला विकास आराखडा व त्यांसंबंधी लागणाऱ्या निधीबाबतचा पाठपुरावा करुन लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपस्थितांना त्यांनी दिले.
To Top