मुंबई दि ३
बंडा तात्या कराडकर यांनी खा. सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे.त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असुन याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर ट्वीट करून माहिती दिली आहे.
सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल दोन दिवसांमध्ये अहवाल आयोगास सादर करावा. तसेच बंडा तात्या कराडकर यांनी ४८ तासांत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा आशा प्रकरच्या सुचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.