सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा बारामती रस्त्यावर मोटारसायकल झाडावर धडकून झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी साडेसात वाजता करंजेपुल घोडके पेट्रोल पंप जवळ ही घटना घडली.
सोरटेवाडी येथील प्रथमेश नामदेव गायकवाड वय १७ या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर त्याचा मित्र मयूर सोरटे हा जखमी झाला आहे. मयूर हिंदुराव सोरटे वय १७ याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिली आहे.
सविस्तर हकीकत अशी की प्रथमेश गायकवाड व मयूर सोरटे हे दोन्ही विद्यार्थी सकाळी आपल्या दुचाकीवरून खाजगी शिकवणीला निघाले होते. शाळेत जात असताना त्यांची दुचाकी झाडावर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले होते. त्यांना सोमेश्वर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले असता डॉक्टरांनी प्रथमेश गायकवाड हा उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे घोषीत केले तर मयूर सोरटे हा जखमी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू केले.
COMMENTS