सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आज बंडातात्या कराडकर यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. विशेष करून बारामतीत बंडात्यात्या कराडकर यांच्या पोस्टर ला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्याच बारामतीत कोऱ्हाळे बु येथे सिद्धेश्वर मंदिरात तब्बल दीड तास समाजप्रबोधनपर कीर्तन दिले.