भोर विसगाव खोरं ! स्वानंदी शिक्षण हे विध्यार्थी-पालक व शिक्षकांसाठी वरदान : केंद्रप्रमुख प्रभावती कदम-कोठावळे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये मुलांच्या अध्ययनासाठी अवधान स्थिर ठेवणे ,एकाग्रता राखणे, संतुलन स्थिर ठेवणे व उचित उद्दिष्टापर्यंत पोहोचणे यासाठी भोर पंचायत समिती गटशिक्षनाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी सुरु केलेले स्वानंदी शिक्षण हे विद्यार्थी- पालक व शिक्षक यांच्यासाठी वरदान ठरले आहे.याचा उपयोग भविष्यातील शिक्षण पद्धतीला होणार आहे असे प्रतिपादन भोर तालुक्याच्या विसगाव खोऱ्यातील आंबाडे केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रभावती कदम-कोठावळे यांनी  शिक्षण परिषदेमध्ये केले.
          वीसगाव खोऱ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाले ता.भोर येथे शनिवार दि-५ घेण्यात आलेल्या शिक्षण परिषदेमध्ये केंद्रप्रमुख बोलत होत्या.शिक्षण परिषदेमध्ये आदर्श शिक्षक भीमराव शिंदे व महादेव बदक यांनी अध्ययन स्तर सद्यस्थिती याविषयी मार्गदर्शन केले.तर प्रास्ताविक विठ्ठल आखाडे यांनी केले.यावेळी शिक्षक नेते बापू जेधे,संदीप घाडगे,संजय पवार,आदर्श शिक्षक खंडू घोलप,राजू कारभळ,जयश्री घोडके,माधुरी घाटे,आनंदा सावले,भारती आवारी आदींसह अनेक शिक्षक उपस्थित होते.

To Top