सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहून उच्च ध्येय ठेऊन कष्ट करण्याची प्रवृत्ती ठेवल्यास यश हमखास मिळते असे मत यशस्वी विध्यार्थ्यांना सन्मानीत करताना प्रांताधिकारी राजेंद्रकुमार
जाधव यांनी यांनी व्यक्त केले.
स्वच्छ सर्वेक्षण २0२२ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत वाई
नगरपरिषद व पालिका शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित विविध गुणदर्शन स्पर्धेमघील विजयी स्पर्धकांच्या सत्कार्रसंगी प्रांताधिकारी जाधव बोलत होते. यावेळी तहसीलदार रणजित भोसले, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, नगरपालिका अधीक्षक नारायण गोसावी यांची प्रमुख
उपस्थिती होती. नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण २0२२ व माझी वसुंधरा अभियानाची सुरवात विद्यार्थ्यांच्या सहभागाने चित्रकला स्पर्धा, पथनाट्य व विविध
स्पर्धात्मक गुणदर्शन उपक्रमांनी कुटुंब व समाजात जनजागृतीने केली आहे. या अभियानात जवळपास
१00 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत चित्रकलेतून 'स्वच्छ वाई, सुंदर वाई' स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरणातून प्लॅस्टिक बंदी, आपली कृष्णामाई, माझी वसुंधरा व स्वच्छता अभियानाबाबत अभिनय व कलादर्शनातून दिलेला स्वच्छतेचा संदेश कुटुंबाकुटुंबापर्यंत पोचण्यास मदत होणार आहे. भविष्यात वाईकरांच्या सहकार्याने शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधण अभियान विविध उपक्रमांमधून यशस्वीरीत्या राबवले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांनी दिली.
कार्यक्रमास नगरपालिका अधिकारी, कर्मचारी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपाली साबळे यांनी केले.