सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील बाजारपेठेत अनेक वर्षांपासून भरणारा मंगळवारचा आठवडे बाजार तिसऱ्या टप्प्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रामबाग येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरणार असल्याचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी सांगितले.
भोर शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे रुग्ण मंदावले आहेत.मात्र तालुक्यातील कोरोना संपुष्टात आलेला नाही.कोरोना संपुष्टात आणण्यासाठी मंगळवार पेठेत भरणारा आठवडे बाजार भोर बाजार समितीच्या भव्य प्रांगणात भरवला जाणार आहे.याची नोंद व्यपाऱ्यांनी घ्यावी तसेच नागकांनी नियमांचे पालन करून गर्दी न करता सहकार्य करावे असे आवाहन भोर नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी केले आहे.