सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून श्री मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी विकास पॅनेल व श्री मल्लिकार्जुन विकास पॅनेल मध्ये जोरदार लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्हीही बाजूकडील प्रचार प्रमुख व उमेदवारांनी मतदार राजाचे दार ठोठावत मतदान करण्याची साद घातली आहे.प्रचाराची रंगत वाढली असून अशा स्थितीत मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे १३ फेब्रुवारी ला स्पष्ट होणार आहे.
अंतिम यादी प्रसिध्द करून गुरुवार(दि. ३) रोजी चिन्ह वाटप झाले. यानंतर दोन्हीही बाजूकडून मुरुम येथील भैरवनाथ मंदिर व मल्लिकार्जुन मंदीरात प्रचाराचा शुभारंभ झाला. प्रचाराची वाहने, निवडणूक चिन्ह, माहिती पत्रक, वाड्यावस्त्यांवर होणाऱ्या प्रचार सभा, गावकी- भावकीला घातलेली साद, मतदारांना आपल्या पारड्यात खेचण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे त्यामुळे कधी नव्हे ती किंमत मतदार राजाला आली आहे. येत्या आठवडाभरात प्रचार अजून शिगेला पोहचलेला दिसणार आहे. दोन्हीही बाजूकडून विजयाचा दावा केला जात आहे मात्र मतदार कोणाला कौल देतात हे येत्या रविवारी स्पष्ट होणार आहे.
COMMENTS