बारामती ! सोरटेवाडी येथे नऊ एकर ऊस जळून खाक : सुमारे पाच लाखाचे नुकसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी ता बारामती येथे नऊ एकर ऊस जळून खाक झाला यामध्ये सहा शेतकऱ्यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 
           दि १४ रोजी दुपारी शेजारील तुटून गेलेल्या उसाचे पाचट पेटवताना वाऱ्याने ठिणगी उडून सदरील आग लागल्याचे तंटामुक्तीचे अध्यक्ष महेंद्र शेंडकर यांनी सांगितले. दुपारी उन्हाचा तडाखा आणि वाऱ्याचा जोर असल्याने आग झपाट्याने पसरली यामध्ये कारखान्याला तुटून जाणारा पाच एकर व सुरुची लागण चार एकर ऊस जळाला. जवळपास ५० च्या वर ग्रामस्थ ही आग विजवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यानंतर सोमेश्वर कारखान्याच्या अग्निशामक बंबाने आग विजवली. मात्र तोपर्यंत नऊ एकर ऊस जळाला होता. यामध्ये महेंद्र शेंडकर, बुवासाहेब शेंडकर, नवनाथ शेंडकर, तुकाराम शेंडकर, मोहन शेंडकर व बुवासाहेब बाबुराव शेंडकर या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली.
To Top