सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर ! प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डिजिटल सभासद नोंदणी अभियानांतर्गत मुख्य नोंदणीकर्ता म्हणून भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील खानापूर येथील जयवंत तुकाराम थोपटे यांचा मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
टिळक भवन मुंबई येथे हा सन्मान सोहळा पार पडला.यावेळी राज्याचे प्रभारी एच.के.पाटील,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,ऊर्जामंत्री नितीन राऊत,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,भोर-वेल्हा-मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे तसेच विसगाव खोऱ्यातील कार्यकर्ते सरपंच प्रमोद थोपटे,दत्ता तनपुरे,जयवंत कोंढाळकर, संतोष रवळेकर उपस्थित होते.