सुपे परगणा ! रोटरी क्लबचा अध्यक्षपदी उद्योजक सुभाष चांदगुडे

Pune Reporter


सुपे प्रतिनिधी  दि १४

      बारामती तालुक्यातील सुपे येथे रोटरी क्लबची स्थापना करण्यात आली. या रोटरी क्लबच ऑफ सुपे परगणाच्या अध्यक्षपदी सुभाष चंद्रकांत चांदगुडे यांची निवड करण्यात आली. 

           सुपे येथील माऊली लॉन्सच्या कार्यालयात रोटरीच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पुणे येथील रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा यांच्या हस्ते क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चांदगुडे व संस्थापक सचिव पोपट चिपाडे यांना क्लबचे नोंदणी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
    यावेळी उपाध्यषपदी हृषीकेश दरेकर, खजिनदारपदी शंकरराव चांदगुडे यांच्यासह हनुमंत चांदगुडे, गोपाल पन्हाळे, राहुल भोंडवे, अशोक लोणकर, प्रतिक सुपेकर, प्रतिक चांदगुडे, अच्युत नगरे, डॉ. जयदिप चांदगुडे, अमोल बारवकर आदींसह ३० जणांची या कार्यकारणीवर निवड करण्यात आली. 
    याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, पुणे डिस्ट्रिक्ट मेम्बरशिप डायरेक्टर शीतल शहा, धनश्री जोग, सुधीर दफ्तरदार, दत्तात्रय बोराडे, पंकज पटेल, मुकेश सोहनी, संजय दुधाळ, रविकिरण खरतोडे, पार्श्वेंद्र फरसोले, हणमंतराव पाटील व अजय दरेकर तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे मान्यवर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 
   सुपे परिसरातील आरोग्य, शिक्षण व पर्यावरण उपक्रमांची गरज लक्षात घेऊन वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष चांदगुडे यांनी दिली. यावेळी वृक्षारोपण करुन नुतन रोटरी क्लबच्या कामाची सुरुवात करण्यात आली.    
   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक लोणकर यांनी केले. तर आभार पोपट चिपाडे यांनी मानले. 
To Top