सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत ता बारामती येथील वसंतराव जयसिंगराव काकडे यांचे अल्पशा आजार निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. त्यांनी सोमेश्वर कारखान्यात त्यांनी २० वर्ष स्टोअर किपर म्हणून काम पाहिले तसेच ते १० वर्ष निंबुत ग्रामपंचायतचे सदस्य होते. डॉ. विक्रम काकडे व डॉ विराज काकडे यांचे वडील तर आनंदराव काकडे यांचे ते बंधू होते.