Crime News ! कंपनीत पैसे गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या मोरगावच्या भामट्याविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल

Pune Reporter
बारामती दि ११

बारामती तालुक्यातील मोरगाव येथील पॅनकार्ड क्लब कंपनीमध्ये तब्बल पन्नास हजारांची गुंतवणूक करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपी अशोक शिवाजी तावरे (रा. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे) याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश दत्तात्रय तावरे, वय ५२ वर्षे, (रा. हनुमान नगर, मोरगाव, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत वडगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश तावरे हे शेती व्यवसाय करून कुंटूबाची उपजिविका करतात. २००७ मध्ये मोरगावातील संशयित आरोपी अशोक तावरे हे पनकार्ड क्लब लिमीटेड मुंबई या कंपनीचे एजंट म्हणून काम करीत होते. त्यावेळी ते फिर्यादींच्या घरी येवून त्यांना भेटत असत व पनकार्ड कंपनी बद्ल माहिती सांगत असत. या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास देखील ते सांगायचे. त्यानुसार त्यांच्या सांगण्यानुसार १३ जानेवारी २००७ रोजी फिर्यादींनी अशोक तावरे यांनी घरी बोलवून ५०, ५०० रोख स्वरूपात दिले. त्यावेळी आरोपी अशोक तावरे हे फिर्यादींना म्हणाले की, जरी ही पनकार्ड क्लब कंपनी बंद पडली तरी मी तुमचे पैसे देईल.

त्यानंतर सन २०१२-२०१३ मध्ये ही पनकार्ड क्लब  लिमीटेड ही कंपनी बंद पडल्याचे आरोपी तावरे यांनी फिर्यादींना सांगितले.

 त्यानंतर १३ ऑगस्ट २०१६ या अंतिम तारखेपर्यंत सर्टिफिकेट प्रमाणे संशयित आरोपीने परतावा मिळेल, असे सांगून पावती दिली. त्यानंतर फिर्यादींनी वेळोवेळी पैसे मागितले असता, महिन्याने देतो, दोन महिन्याने देतो असे सांगत फिर्यादींची फसवणूक केली असून, आजतागायत पैसे दिले नाहीत. मात्र माझा विश्वास संपादन करून गुंतवणूक करण्यास भाग पाडून आरोपीने माझी फसवणूक केली आहे. असे फिर्यादीत म्हणटले आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस अधिक तपास करीत आहे.
To Top