मागील आठ दिवसात 'सोमेश्वर'वरील दोन ऊसतोडणी कामगारांच्या आत्महत्या : झाडाला गळफास घेत संपवलं जीवन

Pune Reporter
सोमेश्वरनगर दि ११

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरती ऊसतोडणी कामगारांच्या निवासी तळावर  पुन्हा एकदा एका उसतोडणी कामगारांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली असून मागील आठ दिवसांपूर्वी हि एका उसतोडणी कामगारांनी आत्महत्या केली होती .

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार  ऊसतोडणी कामगार रामदास महादेव घुले वय १९ रा देवलिमगाव ता :आष्टी जि: बीड   याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली असून  दि १० फेब्रुवारी रोजी रात्री ही घटना घडली आहे घटनास्थळी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी भेट दिली असून. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाली असल्याची माहिती इतर उसतोडणी कामगारांनी दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस करीत आहेत.

 

  
To Top