भोर ! तालुक्यात दोन वर्षांनी घुमला...... हर हर महादेवाचा गजर.....!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षांपासून  पारंपारिक सण तसेच देव-देवतांचे उत्सव बंद होते. मात्र यंदा कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने देवदेवतांच्या उत्सवांना सुरुवात झाली आसल्याने पहिल्याच महाशिवरात्री उत्सव भाविक-भक्तांनी शंभो महादेवाचा गजर करीत चक्क दोन वर्षांनी उत्साहात साजरी केली.
            तालुक्याच्या महत्त्वाच्या बनेश्वर,नागनाथाचे अंबवडे,रायरेश्वर किल्ला,निगुडघर,पाले,खानापूर, भोर शहर ,धांगवडी,आंबेघर येथील शिवकालीन तसेच ग्रामीण भागातील गावोगावच्या शिवमंदिरात भाविक भक्तांनी सकाळपासूनच गर्दी करून शंभू महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तर काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रम कीर्तन,भजन पार पाडण्यात आले.कार्यक्रमस्थळी तरुणांसह वृद्धांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

To Top