सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सांगवी येथील प्राथमिक शिक्षिका हर्षदा मारुती जगताप यांना सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार अल्पबचत भवन, पुणे येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे , आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. वीस वर्षाच्या सेवा काळामध्ये जगताप यांनी अनेक मुले पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आलेली आहेत. मंथन प्रज्ञाशोध एन एस एस ई प्रज्ञाशोध परीक्षा आदी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. शाळेमध्ये सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित असतात. कृतीयुक्त शिक्षण, ज्ञानरचनावादी शिक्षण, ॲक्टिविटी बेस लर्निंग, आता नव्याने कोडींगचे शिक्षण मुलांना देण्यामध्ये त्या नेहमी अग्रेसर असतात.
त्यांच्या या यशाबद्दल बारामती तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले .त्याचबरोबर त्यांच्या सहकारी शिक्षकांसह चोपडज, सांगवी पंचक्रोशीतून त्यांच्या अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन कौतुक केले आहे.
COMMENTS