सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील चाळीसगाव खोऱ्यातील वडतुंबी ता.भोर येथील ह.भ.प. माणिकराव माधवराव जेधे (वय-९४)यांचे सोमवार दि. निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे,सुना नातू, परतुंड असा परिवार आहे.बालपणापासून जेधे यांना अध्यात्माची आवड होती.भोर तालुका धर्मशाळा पंढरपुर येथे ट्रस्टी होते. तर रायरेश्वर धर्मदाय संस्था भोर तालुका आळंदी धर्मशाळेवर ते उपाध्यक्ष होते. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायामध्ये खूप हळहळ व्यक्त केली जात आहे.आंबवडे येथील प्रा.ज्ञानेश्वर जेधे यांचे ते वडील होत.
COMMENTS