सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
मालखेड ता.हवेली येथे एका कातकरी समाजाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार करून मालखेड ते थोपटेवाडी परिसरातील पुलाच्या मोरीत बलात्कारी आरोपी संजय बबन काटकर वय-३८ रा.कादवे(पानशेत)ता.वेल्हा याने फेकून दिले होते.या आरोपीस न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
वेल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ फेब्रुवारी २०२१ ला एक कातकरी समाजाची लहान मुलगी हरवले बाबत तक्रार नोंद करण्यात आली होती.सदर मुलीचे अपहरण झाले बाबत संशय आल्याने वेल्हे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास करून पीडित मुलगीचा शोध लावला.मात्र पीडित चिमुरडी मालखेड ता.हवेली ते थोपटेवाडीकडे जाणाऱ्या पुलंच्या मोरीत मयत अवस्थेत आढळून आली होती.आरोपी संजय काटकर यास पोलिसांनी ४८ तासाच्या आत शोधून अटक करून न्यायालयात हजर केले.जलदगतीने खटला सुरू करून न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार,सहाय्यक फोजदर सुदाम बांदल,औदुंबर अडवाल,आर.एस. गायकवाड,ये.पी.शिंदे,ये.आर.साळुंखे,एस. आर.ओमासे यांनी तपासकामी मदत केली.
COMMENTS