बारामती l कोऱ्हाळे बु ! येथे सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
कोर्‍हाळे बु|| येथे महाशिवरात्र श्री.सिध्देश्वर मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली. श्री.सिद्धेश्वर मंदिर हे पांडवकालीन असून, हे मंदिर एका दगडामध्ये पांडवांनी एका रात्रीत बांधले आहे अशी आख्यायिका आहे..       मंदिरामध्ये दगडामध्ये कोरलेली अत्यंत सुंदर अशी शिल्प पाहायला मिळतात. श्री सिद्धेश्वर मंदिरा मधील पिंड ही उंचीने मोठी असुन,सुरेख संदर आहे.या महाशिवरात्र यात्रेनिमित्त कोर्‍हाळे बुद्रुक आणि परिसरातील माळशिकारे‌ परिवाकडून खिचडी प्रसाद वाटप केली जाते. कोरोना काळात गेले दोन वर्षे मंदिरे बंद होती. कोरोनाचे  प्रतिबंध कमी झाल्याने लोकांमध्ये मोठा उत्साह होता.मोठ्या संखेने लोकांनी आज गर्दी केली होती. आज माळशिकारे कुटुंबियांच्या वतीने ७०० किलो शाबुदाना खिचडी,
केळी २ टन केळीचे वाटप केले. 
        सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. 

To Top