सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
२८ फेब्रुवारी म्हणजे 'जागतिक विज्ञान दिनाचे' औचित्य साधून सह्याद्री पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांमधील जिज्ञासु, चिकित्सक वृत्ती वाढीस लागण्यासाठी वेगवेगळ्या प्रयोगांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामध्ये पाणी शुद्धीकरण, ठिबक सिंचन, सौर यंत्रणा, सेंद्रिय शेती अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर करून माहिती दिली. Water despenser,Model of periodic table, Types of pollution and their sources, Elements and valencies model,Quiz board,Laws of exponents,Volcano model,Air cooler,Salt energy,Water filter,Light house, Wind mill, अशा अनेक विषयांवर प्रयोग सादर केले होते.
हे प्रयोग बनविण्यासाठी विज्ञान शिक्षक दिपलक्ष्मी जाधव, अंजली लकडे ,सारिका कोंडे ,गणित शिक्षक आयुष्या सूर्यवंशी ,तसेच प्राचार्य वाघमारे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या प्रात्यक्षिकांचे संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत व धनश्री सावंत यांनी प्रयोगांची पाहणी केली व कौतुक केले. या प्रदर्शनासाठी उपप्राचार्या खताळ मॅडम इतर शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहकार्य केले.