सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती लोकसभा मतदारसंघ युवासेना जिल्हा कार्यकारणीची निवड नुकतीच करण्यात आली . यामध्ये परेश तुकाराम भापकर यांची पुणे जिल्हा चिटणीस पदी निवड झाली .
शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव वरुण सरदेसाई , गणेश कवडे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ जिल्हा कार्यकारणीच्या नियुक्त्या करण्यात आल्या . यामध्ये बारामती तालुक्यातील तरडोली येथील परेश भापकर यांची पुणे जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे . या निवडीनंतर बोलताना भापकर यांनी सांगितले की , पक्ष संघटना गावपातळीवर बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असून शिवसेनेची विचारधारा प्रत्येक व्यक्तीप्रर्यत पोहचविणार आहे .