सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
केंजळ ता.वाई येथे दि.१२ च्या मध्यरात्री भैरवनाथ मंदिरा समोर शासनाच्या कुठल्याही खात्याची परवानगी न घेताच अनाधिकृत पणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याची माहिती वाईचे तहसीलदार रणजित भोसले वाईच्या डिवायएसपी शितल खराडे जानवे वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकबाळासाहेब भरणे भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांना मिळताच त्यांनी हे प्रकरण गंभीर असल्याने याची माहिती जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस प्रमुख यांना देण्यात आल्याने केंजळ गावात मोठ्या प्रमाणात पोलिस फौज फाटा तैनात करुन गावाची शांतता आबाधित राखण्या साठी प्रयत्न केले पण संध्याकाळी अॅडीशनल एसपी
बोराडे यांनी बसवलेल्या अनाधिकृत पुतळ्याची
पाहणी करून क्षणार्धात पोलिसांना अलर्ट
राहण्याचे आदेश देऊन पुतळा परिसरात दिवसभर हजारो तरुणांचा जमाव ऊपस्थित होता त्या जमावाला तात्काळ पुतळा परिसर रिकामे करण्याचे आदेश देऊन रात्री ऊशीरा
अथक परिश्रम घेऊन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांच्या ऊपस्थितीत अखेर तो पुतळा काढुन भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांनी तो ताब्यात घेऊन जप्त करुन तो पोलिस ठाण्यात जमा केला आहे.
हा अनाधिकृत पुतळा बसवणार्या एकुण ३६ लोकांनवर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
१ चंदन संकपाळ २ संकेत राजेंद्र येवले ३ अमीत कदम ४ गुरु कदम ५ सागर सुनील कदम ६ ओंकार बाबर ७ वरुन जंगम ८ अक्षय ऊर्फ पप्यु जगताप ९ आकाश बोबडे १० शंतनु जगताप ११ संकेत चौधरी १२ आशिष जगताप
१३ अभिजीत जगताप १४ प्रतिक विकास मोहिते १५ अनील जगताप १६ विपुल कदम १७ राहुल माने १८ गोट्या जगताप १९ संकेत जगताप २० दर्शन हणमंत कदम २१ शैलेश कदम २२ शंतनु कदम २३ आदित्य बाबर २४ आदित्य चौधरी २५ अनिकेत जाधव राहणार शेंदुरणे २६मोन्या संकपाळ २७ रणजित जमदाडे २८ सुमीत चव्हाण २९ बंटी जाधव ३० समीर जाधव ३१ प्रमे येवले ३२ तुषार जगताप ३३ अभी कदम ३४ आदित्य चौधरी ३५ संकेत रामदास गोळे राहणार गोळेवाडी ता.खंडाळा ३६ रुतेश प्रताप शिंदे तसेच त्यांना मदत करणारी ईतर लोक यांनी सातारा जिल्ह्या मध्ये दि .१२|२|२२ रोजी रात्री या कालावधीत जमाव बंदी आदेश असताना कट करुन बेकायदेशीर जमाव जमवुन देशा मध्ये कोरोनो विषाणुंचा प्रादुर्भाव व संसर्ग असताना साथीचे रोग पसरतील हे माहित असताना समांतर अंतर न ठेवता सार्वजनीक बांधकाम विभाग खात्याची केंजळ येथील दर्शनी जागे मध्ये विद्रुपी करुन संमधीत कोणत्याही खात्याची परवानगी न घेता जनसमाजात तेढ निर्माण व्हावी हा हेतुने छत्रपती शिवाजी महाराजांचा अनाधिकृत पणे पुतळा उभारून त्यांचे पावित्र्य भंग केले म्हणून वरील ३६ आरोपी विरुद्ध भुईंज पोलिस ठाण्यातील पोलिस कॉस्टेबल सचिन सूर्यकांत नलवडे वय ३४ वर्ष यांनी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . याचा अधिक तपास सपोनि आशिष कांबळे हे करीत आहेत.