बारामती ! पणदरे उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व उपकेंद्रावरील ५३८० बालकांचे लसीकरण होणार : डॉ. वैशाली अडकमोल ! माळेगाव कारखान्यावरील ३५४ बालकांना लसीकरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगाव : प्रतिनिधी
    पणदरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व उपकेंद्रातील ५३८० बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली अडकमोल यांनी दिली.दरम्यान माळेगांव कारखाना कार्यक्षेत्रातील ३५४ बालकांना पोलिओ लस देण्यात आली आहे.
    आज देशभरात ० ते ०५ वयोगटातील लहान बालकांना पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.माळेगाव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात माजी सभापती संजय भोसले यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ लस देण्यात आली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल शिंदे, डॉ.निकिता मुळिक, डॉ.भक्ती सुभेदार,शाम गायकवाड, आरोग्य सहायक ए.ए.आत्तार, एस.डी.दांडेकर, परिचर राजु सुतार, सर्व आशा स्वंयसेविका, अंगणवाडी सेविका,वहान चालक मोहन नेवसे यांनी मोलाची मदत केली.
       दरम्यान पणदरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत भिकोबानगर,मानाची नगर, कुरणेवाडी,को-हाळे बु,थोपटेवाडी,माळशिकारेवाडी,सोनकसवाडी,खामगळवाडी, माळेगांव बु व खुर्द,पाहुणेवाडी, शिवनगर येथे सुरळीत लसीकरण सुरू होते अशी माहिती पणदरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली अडकमोल यांनी दिली.
----------------
 माळेगाव कारखाना कार्यस्थळावर विविध भागातुन उस तोडणी मजुरांच्या बालकांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले असून ३५४ बालकांना पोलिओ लस देण्यात आली.
   
To Top