गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना अष्टविनायकाची भुरळ... ! रांजणगाव व मोरगाव येथे घेतले कार्यकर्त्यांसह गणपतीचे दर्शन...!

Pune Reporter
मोरगाव दि २६
गोव्याचे मुख्यमंत्री  प्रमोद सावंत  आज  मयुरेश्वर दर्शनासाठी मोरगांव ता. बारामती येथे आले होते . त्यांनी अभीषेक , पुजा करुन श्रींची आरती केली .

आज दि.२६ गोवा राज्याचे  मुख्यमंत्री प्रमोद सावंत मयुरेश्वर दर्शनासाठी मोरगाव येथे आले होते . शिर्डी , व रांजणगाव येथील  महागणपती दर्शनानंतर ते मोरगाव येथे निवडक कार्यकर्त्यांसमवेत  आले होते. त्यांनी श्रींची  अभीषेक पुजा व आरती करुन मंदिर परीसरातील विविध मुर्तींचे दर्शन घेतले . यावेळी पुजारी  कौस्तुभ वाघ , गजानन धारक , महेश गाडे  , भाजपाचे  रवींद्र साळवे आदी उपस्थित होते . मुख्यमंत्र्यांनी  मंदिर परीसरात झालेल्या विविध विकास कामांची पाहणी केली . मंदिरात  असणारी स्वच्छता विषयी  कौतुक केले .यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे  विश्वस्त  विनोद पवार यांनी त्यांचा शाल व श्रींची प्रतीमा देऊन  तर  सरपंच निलेश केदारी यांनी  श्रीफळ व श्रींची प्रतीमा देऊन सन्मान केला .

यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की  गोवा राज्यात भाजपाचे स्पष्ट बहुमत असणारे सरकार येणार आहे . तसेच जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी मिळेल असे साकडे त्यांनी मयुरेश्वरास घातले .
To Top