बारामती पश्चिम ! वाघळवाडी गावातील तीनशे महिलांचा अभ्यास दौरा

Admin
3 minute read
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील  महिलांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ बारामती टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा.सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.  कार्यक्रमाला पाहुणे जिल्हा परिषद पुणे बांधकाम व आरोग्य सभापती  प्रमोद काकडे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक  राजवर्धन शिंदे,  ऋषिकेश गायकवाड उपस्थित होते.
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नंदा सकुंडे होत्या. .सुनेत्रा पवार यांचा स्वागत व सत्कार सरपंच नंदा सकुंडे व उपसरपंच  जितेंद्र सकुंडे यांनी केले. हा अभ्यास दौरा वाघळवाडी - ओझर - लेण्याद्री - नाशिक पंचवटी - त्रंबकेश्वर - श्री सप्तश्रुंगी देवी वनी - शिर्डी - राहुरी कृषी विद्यापीठ - आदर्श गाव हिवरे बाजार - वाघळवाडी कसा प्रवास झाला.
सौ सुनेत्रा वहिनी पवार यांनी या अभ्यास दौर्‍याबद्दल महिलांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था कुठे कशी केली आहे याबाबत ग्रामपंचायतीला विचारणा केली व सर्व महिलांची प्रवासादरम्यान काळजी घेण्याबाबत सांगितले व काही दौऱ्यामध्ये मदत लागली तरी मला फोन करा असे त्यांनी सांगितले. कारण की एवढ्या मोठ्या  प्रमाणात गावातील महिला या अभ्यास दौऱ्यासाठी येत आहेत  ही बाब खरंच कौतुकास्पद आहे. यावरून ग्रामपंचायतीचे  काम उत्कृष्ट प्रकारे चालू आहे हे दिसून येत आहे असे त्या आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. 
         ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग व ग्रामनिधी मधून अभ्यास दौऱ्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली होती. ग्रामपंचायतीने अभ्यास दौऱ्यासाठी ६ आरामदायी बसेस, जेवण, नाश्ता, चहा व राहण्याची व्यवस्था केलेली होती.
सरपंच.नंदा सकुंडे त्यांनी मनोगतामध्ये महिला घराबाहेर पडत नाही त्यामुळे त्या अज्ञानी राहतात, त्यांना कोणत्याही स्वरूपाचे मनोरंजन मिळत नाही. यापुढे अशा अभ्यास दौरा, सहलीचे आयोजन करून महिला एकत्र केल्या जातील व त्यांना स्वतःच्या पायावर सक्षम करण्यासाठी आर्थिक साक्षर  करण्यासाठी बचत गटामार्फत काम करण्याचे चालू आहे. त्यासाठी आम्ही गावात जवळपास महाराष्ट्र शासन च्या उपक्रमातून ३३ ते ३४ महिला बचत गट स्थापन करून  त्यामध्ये ३७५ ते ४०० महिला सहभागी झालेले आहेत. २० ते २२ बचत गटांना शासनातर्फे १५,००० रूपये अनुदान मिळालेला आहे उर्वरित बचत गटांचे अनुदान लवकरच जमा होईल.
या कार्यक्रमाला बारामती तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष  सतीश सकुंडे, बारामती तालुका राष्ट्रवादी महिला सरचिटणीस सुचिता साळवे, माजी उपसरपंच  गणेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य  पांडुरंग भोसले, हेमंत गायकवाड, दीपक दनाने, दत्तात्रय दडस, चेतन गायकवाड, शीला सावंत, सुरेखा सावंत, लता शिंदे, ज्योती कडाळे, श्रद्धा भुजबळ, सारिका जाधव, शबेराबी पठाण  ग्रामविकास अधिकारी नरसिंग राठोड, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश सावंत, स्वागत हेमंत गायकवाड व आभार तुषार सकुंडे यांनी केले.
To Top