डायरेक्टर चषक ! सोमेश्वरनगर येथे आज ६० संघ भिडणार आमने सामने

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे आज सायंकाळी सात वाजता हापपिच नाईट क्रिकेट सर्कल चे आयोजन करण्यात आले असून ६० संघ आमने सामने भिडणार आहेत. 
             आज रात्री ७ वाजता या सामन्यांना सुरुवात होणार असून सामने संपण्यास रात्र लागू शकते. यासाठी पुणे जिल्ह्यातील अनेक संघांनी नोंदणी केली आहे. यासाठी प्रथम २११११, द्वितीय १५५५५, तृतीय १११११ तर चतुर्थ ५५५५ हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल तसेच सेमी फायनलच्या चार संघांना टी शर्ट देण्यात येणार आहेत.
To Top