सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर पंचायत समितीचे उपसभापती रोहन बाठे यांना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या वतीने आदर्श उपसभापती पुरस्काराने केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पुणे येथे सोमवार दि-७ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला.यावेळी राज्य जिल्हा परिषद -पंचायत समिती सदस्य असोसियनचे अध्यक्ष कैलास गोरे पाटील व पुरस्कार निवड समिती अध्यक्ष शरद बुट्टे पाटील,कार्याध्यक्ष उदय बने,सुभाष घरात,नगर परिषद अध्यक्ष राम जगदाळे,राज्यातील कोकण,पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा,विदर्भ येथून जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,पंचयस्त समिती सभापती,उपसभापती उपस्थित होते.
COMMENTS