मोरगाव ! श्री मोरया सोसायटीची निवडणूक बिनविरोध

Pune Reporter
मोरगाव दि ९

श्री मोरया विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूक प्रक्रिया  बिनविरोध झाल्यानंतर आज चेअरमन व व्हाईस चेअरमची निवड  संपन्न झाली . यामध्ये  चेअरमन पदी नितीन पोपट तावरे तर व्हाइस चेअरमन पदी  शिवदास दिगंबर गायकवाड यांची बिनविरोध  निवड  झाली .

आज चेअरमन पदाच्या निवड प्रसंगी सुनील दत्तात्रय तावरे , संजय प्रभाकर तावरे , गोरख दिनकर सणस , चंद्रकात हरीदास नेवसे , सुशील सिद्राम तावरे   , नितीन पोपट तावरे , नवनाथ रामचंद्र नेवसे,  शिवदास दिगंबर गायकवाड ,  मनिषा बाबा पालवे, एकनाथ विठोबा  थोरात ,पोपट काशीनाथ तावरे , पोपट श्रीमंत ढोले,मंदाकीनी मारुती तावरे हे सदस्य उपस्थित होते . माजी सरपंच पोपट सर्जेराव तावरे  यांच्या  श्री गणेश मयुरेश्वर सर्वधर्म विकास पॅनलच्या सदस्यांपैकी नितीन पोपट तावरे व  शिवदास दिगंबर गायकवाड  यांनी अनुक्रमे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी अर्ज दाखल केले .

  निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून पाटणे यांनी कामकाज पाहीले . नवनिर्वाचीत पदाधीकाऱ्यांचा  सत्कार माजी सरपंच पोपट तावरे व  साहाय्यक निबंधक  मिलींद टांगसाळे  यांनी केला . या निवडीनंतर बोलताना  चेअरमन  नितीन तावरे यांनी सांगितले की सर्व सदस्यांना  विश्वासात  घेऊन  शेतकरी हिताचे निर्णय व पात्र लाभधारक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे  अधीकाधीक  मार्गींलावणार  असल्याचे सांगितले.


To Top