सुपे परगणा ! विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न व्हावेत : संभाजी होळकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे :वार्ताहर 
आजच्या संगणक युगात ग्रामिण भागातील विद्यार्थी टिकला पाहिजे. त्यासाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. तरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाचा दर्जा वाढीस लागेल असे मत जिल्हा बॅंकेचे संचालक तथा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी व्यक्त केले.    
       सुपे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ च्या नव्याने बांधलेल्या चार वर्ग खोल्यांचे उद्घाटन होळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे होत्या.       
        यावेळी पियाजीओ व्हेईकल्स कंपनीच्यावतीने दोन वर्ग खोल्या व एक कार्यालय तर जिल्हा परिषद फंडातुन दोन वर्ग खोल्या मिळुन चार वर्ग खोल्यांचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.        याप्रसंगी सभापती निता फरांदे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, माजी सभापती निता बारवकर, शौकत कोतवाल, सरपंच स्वाती हिरवे, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय हारे, केंद्रप्रमुख हनुमंत चव्हाण, उपसरपंच मल्हारी खैरे, अनिल हिरवे, सुशांत जगताप, ग्रा. पं. सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर, संपतराव जगताप, बापुराव चांदगुडे, गणेश चांदगुडे, बबन बोरकर, अशोक लोणकर, ठेकेदार सुर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असिफ कोतवाल, उपाध्यक्ष फारूख शेख, सुपे केंद्रातील शिक्षक, अरुण सकट, वनिता जगदाळे आदी उपस्थित होते.            विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करत रहावे. तसेच नुतन शाळेच्या राहिलेल्या कामांसाठी लवकरच निधीची पुर्तता करण्यात येईल अशी माहिती होळकर यांनी दिली.   
           कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका विद्या जाधव यांनी केले. सुत्रसंचालन शिक्षक शहाजी कुंभार यांनी केले. स्वागत आसिफ कोतवाल यांनी केले. तर आभार सचिन लवांडे यांनी मानले.            ..................................................
To Top