भोर ! वरंध घाटात अनोळखी मृत्यूदेह सापडला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोर- महाड रस्तावरील वरंध घाटात अनोळखी मृत्यू देह सापडला असून सह्याद्री रेंस्कू, भोर पोलिसांच्या मदतीने हा मृत्यू देह दरीतून बाहेर काढण्यात आला. पुढील तपास भोर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे करत आहे. उंबार्डे गावच्या हद्दीत वरंधा घाट या ठिकाणी वाघजाई मंदिराचे जवळ भोर महाड रोडचे बाजूस डोंगर उताराचे दरिमध्ये मयत स्थितीत साधारण ३० ते ३५ वयाचा पुरुषाचा मृत्यू देह मिळून आलेले असून त्याचे अंगात गुलाबी रंगाचा फुल बाह्याचा टोपी असलेला टि-शर्ट, काळी रंगाची पँट गळ्यात काळ्या रंगाचा दोरा व ताईद कंबरेस काळ्या रंगाचा दोरा व तांबूस रंगाचा पट्टा, हातात स्टिलचे कडे आहे.वरील मयत कोणाच्या ओळखीचे असेल, कोणी ओळखत असेल, कोणी पाहिले असेल तर कृपया भोर पोलिस स्टेशनला संपर्क करावा.असे आवाहन पोलिस निरीक्षक राहूल साबळे , पोलिस हवालदार उध्दव गायकवाड यांनी केले आहे.
To Top